BREAKING NEWS
national

पत्रकार सरंक्षण कायद्याची अमलबजावणी झालीच पाहिजे अंबरनाथ तालुक्यातील पत्रकारांचे तहसीलदारांना निवेदन..!


अंबरनाथ : दिनेश मीरचंदानी 

देशातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पत्रकार सरंक्षण कायदा अस्तित्वात आणला, परंतु या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मागील आठवड्यात बदलापूर शहरात एका अतिसंवेदनशील घटनेची बातमी करणाऱ्या एका महिला पत्रकाराला येथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आवाच्य भाषेत वार्तालाप करून अपमानित केले. बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून वामन म्हात्रे यांच्यावर अट्रोसिटी आणि विनयभंग असा गुन्हा दाखल केला. परंतु एका महिला पत्रकारासोबत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांना पत्रकार सुरक्षा कायदा का आठवला नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत अंबरनाथ तालुक्यातील पत्रकारांनी बुधवारी अंबरनाथ तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन सदर प्रकरणात दोषीवर पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्ग कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.





« PREV
NEXT »

कोई टिप्पणी नहीं

Facebook Comments APPID